बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत मालमत्ता कर भरण्यास मुदतवाढ दिली आहे. तसेच कर भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ५ टक्के सूट देण्याची अधिसूचना अधिसूचित केली आहे. शहरी विकास विभागाने (यूडीडी) जारी केलेल्या परिपत्रकानुसार हे नियम सर्व शहरी स्थानिक संस्थांना लागू होईल. दरम्यान, बृह बेंगळूर महानगरपालिका (बीबीएमपी) वगळता.
दरम्यान, कोरोनामुळे अनेकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कोरोनाचा विचार करता मालमत्ताधारकांच्या सोयीनुसार, त्यानंतरचे लॉकडाऊन आणि संबंधित निर्बंधांचा विचारकरून हा निर्णय घेण्यात आला आहे.