बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान बुधवारी राज्यात कोरोनाचे ७६० रुग्ण सापडले होते. आता गुरुवारी ही संख्या वाढून ७८३ झाली. आरोग्य विभागाने याविषयी बुलेटिन जारी केलं आहे. गुरुवारी राज्यात ४०६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर दोन बढईतंच मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाची सक्रिय प्रकरणे वाढत आहेत. राज्यात गेल्या दहा दिवसात कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये २,००७ ने वाढ झाली आहे. १ मार्च रोजी, राज्यात कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे ५,८२४ होती, ११ मार्च रोजी ही संख्या वाढून ७,८३१ झाली आहे.
राज्यात बाधितांच्या संख्येत बेंगळूर पहिल्या क्रमांकावर आहे. गुरुवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ४९२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर त्याच वेळी १९१ रुग्ण कोरोनावर विजय मिळवीत रुग्णालयातून घरी परतले आहेत.जिल्ह्यात सक्रिय प्रकरणांची संख्या वाढली असून ती ५,८२५ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.