बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान शुक्रवारी राज्यात कोरोनाने ८०० चा टप्पा ओलांडला. शुक्रवारी राज्यात ८३३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या ४८ दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून ३४१ जण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात ५२६ कोरोनाबाधितांची भर पडली आहे.