बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने १० ने पासून राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक रोजगार बंद आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्यांना काही बंधने घालून काम करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने लॉकडाऊन नियमात बदल केल्याने राज्यातील ग्रामीण भागातील अनेक कामगार आणि कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी जारी केलेल्या आदेशात “मनरेगा अंतर्गत काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु काम करताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन मनरेगा कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे.