पुढील ४५ दिवस महत्त्वपूर्ण
बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना संक्रमणाची दुसरी लाट तयार होण्याची शक्यता असल्याचे कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच आगामी ४५ दिवस राज्यासाठी निर्णायक ठरतील, असेही म्हंटले आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असली तरी काही आठवड्यात लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जात काळजी घेतली पाहिजे. परंतु जो पर्यंत लस येत नाही तो पर्यंत नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
तांत्रिक सल्लागार समिती आणि तज्ज्ञांच्या भेटीनंतर मंत्री सुधाकर यांनी २०२१ च्या सुरुवातीच्या महिन्यांत दुसर्या कोरोना लाटेची सर्व शक्यता आहेत ज्यात आम्हाला २० डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत जादा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे ते बेंगळूर येथे म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंतचा हिवाळा कालावधी कोरोना प्रसारास अनुकूल आहे. कोरोनासाठी पुढील ४५ दिवस महत्त्वपूर्ण आहेत. इतर देशांच्या नोंदीनुसार, पहिली लाट ही ४५-९० दिवसांच्या दरम्यान सुरू झाली, असे ते म्हणाले.