बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या २३ प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवा रँकमध्ये पदोन्नती देण्यास केंद्राने सोमवारी मान्यता दिली.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केएएस अधिकाऱ्यांना आयएएस दर्जावर बढती देण्यात आली आहे.
यामध्ये झेहरा नसीम, विजयमहतेश बी दानम्मनावर, गोविंदा रेड्डी, प्रभुलींग कवळीकट्टी, वैशाली एम. एल., रम्या. एस, बाळचंद्र एस.एन., भारती डी, योगेश ए. एम., शिवप्रसाद पी. आर., गंगाधरस्वामी जी. एम., विद्याकुमारी, नागेंद्र प्रसाद के, कुमार, वेंकटेश टी, गायत्री के. एम., पौर्णिमा बी.आर., जयवैभवस्वामी, सांगप्पा, सुरेश बी. इत्नाळ, प्रभु जी, अनुराधा के. एन. आणि नागराज एन. यांची पदोन्नती झाली आहे.
सांगप्पा यांनी कर्नाटक हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिकेच्या निकालानंतर ही पदोन्नती देण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.