ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 140 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 07 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 70 हजार 729 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 278 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1,70,729 रुग्णांपैकी 1 लाख 62 हजार 762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 509 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 2 हजार 458 रुग्णांवर उपचार सुरु
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 42 लाख 49 हजार 101 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 2 हजार 458 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 57 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 11 जण व्हेंटिलेटरवर आहेत.