बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग व आऊटसोर्सिंग कर्मचारी संघटनेने (केएसएचसीओइए) गुरुवारी संप पुकारला आहे. सुमारे ३० हजार राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनचे (एनएचएम) कामगार एकत्र काम करणे थांबवतील. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी संपावर जाणार असल्याने कोविड आयसीयू, फीव्हर क्लिनिक, आइसोलेशन केंद्र आणि प्रभागातील सेवांवर परिणाम होणार आहे. प्राथमिक व दुय्यम संपर्कांची पाहणी व देखरेख प्रक्रियाही विस्कळीत होणार आहे.
केएसएचसीओइएचे अध्यक्ष विश्वराध्य एच.यमोजी यांनी सरकारने आश्वासन देऊनही कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत किंवा मागण्यांचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत केली नाही. वेतनातील तफावत दूर करणे ही केएसएचसीईएची मुख्य मागणी आहे. बुधवारी मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत संपावर जाणरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यमोजी यांनी परिचारिका, रुग्णवाहिका चालक, लॅब तंत्रज्ञ, आयुष चिकित्सक, सल्लागार, पर्यवेक्षक, ज्येष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी कर्मचारी सुरक्षाविना कमी पगारावर सेवा देत आहेत. केएसएचसीओइएया सदस्यांचा कायमस्वरूपी आरोग्य कर्मचाऱ्यांपेक्षा पगार कमी आहे. वेतनातील तफावत सुधारण्यासाठी अनेक मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
आतापर्यंत केवळ पोकळ आश्वासने प्राप्त झाली आहेत. एनएचएम आणि त्याच्या कंत्राटी कर्मचार्यांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सर्व स्तरावर सुधारल्या आहेत. असे असूनही, सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने आमच्या मागण्या मेनी करावयत असे त्यांनी म्हंटले आहे.