प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषदेने देश आणि राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले. या कार्यात कर्मचार्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हा परिषदेच्या लौकिकात भर पडली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी व्यक्त केली कर्मचारी संघटनांच्या वतीने आयोजित दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, त्रिस्तरीय प्रणालीत जिल्हा परिषदेची भूमिका महत्वाची आहे. राज्य आणि केंद्र सरकार आलेल्या सर्व लोकाभिमुख योजना समाजातील शेवटच्या घटकेपर्यंत पोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मचारी पार पाडत असतात. हे करत असताना त्यांना मिळणार्या वैयक्तिक सेवा आणि लाभाच्या अनेक योजनांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांना त्यांचे हक्क सेवा शासनाकडून मिळणार्या विविध सुविधा त्याची इतंभूत माहिती त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. सुरुवातीला वृक्षांना पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन राजू परीट यांनी स्वागत केले. प्रास्ताविक दिनदर्शिकेचे संकल्पक आणि सोसायटीचे माजी चेअरमन महावीर सोळंकुरे यांनी केले. ते म्हणाले, कर्मचा र्यांना सेवा व कर्तव्याची माहिती मिळाली पाहिजे. कामाच्या व्यापात सेवा पुस्तिका, महागाई मिळणारे भत्ते, कालबद्ध पदोन्नती, गट विमा, व्यावसाय आरोग्य योजना आदींबाबत दिनदर्शिकेमध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. ही दिनदर्शिका जिल्हा परिषद कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना निश्चितच लाभदायी ठरणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, प्राथमिक शिक्षक बँक व जिल्हा परिषद कर्मचारी संघटना यांच्यावतीने ही दिनदर्शिका प्रसारित करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष सतीश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे, शिक्षक समितीचे कृष्णात कारंडे, जिल्हा बँकेचे चेअरमन नामदेव रेपे, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्मचारी सोसायटीचे माजी अध्यक्ष एम. आर. पाटील, महिला व बालकल्याण सभापती डॉक्टर पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव, वित्त व लेखा अधिकारी संजय राजमाने, बांधकाम सभापती हंबीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, विनय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, राजेंद्र भालेराव, सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संजय अवघडे यांचेसह कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.