ऑनलाईन टीम / पुणे :
मा. स. गोळवलकर गुरुजी पूर्व-प्राथमिक शाळेत ‘बंटी-बबली भाजी मंडई’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, वजनमाप, मार्केटिंग, संवाद कौशल्य यांची माहिती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाजी खरेदीसाठी पालकांनी मोठी गर्दी केली होते. शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका मंजुषा खेडकर,पर्यवेक्षक विकास दिगजकर, अपर्णा साने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.