क्लेअर आणि रिचर्ड या चित्रकार जोडप्याची ही कहाणी आहे. क्लेअर ही एक उत्कृष्ट चित्रकार आहे. पण आपल्या पतीच्या म्हणजेच रिचर्डच्या चित्रकलेच्या कारकिर्दिसाठी ती आपल्या करिअरवर पाणी सोडते. रिचर्ड आपल्या नव्या चित्रप्रदर्शनाची तयारी करत असतानाच त्याला एक दुर्धर आजार होतो. इतर चित्रकारांपासून ही गोष्ट लपविण्यासाठी क्लेअरची धडपड सुरु होते. तर दुसरीकडे त्याची मुलगी आणि नातवाची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करते. क्लेअर पुन्हा आपल्या चित्रकलेकडे लक्ष केंद्रित करते. आपल्या नवऱयाच्या छायेखालीच राहायचे की पुन्हा आपल्या कारकिर्दिला प्राधान्य द्यायचे अशी द्विधा मन:स्थिती द आर्टिस्ट वाईफ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लेना ऑलिन, ब्रुस डर्न, ऍवान जोगिआ, ज्युलिएट रायलान्स यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. टॉम डॉल्बीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई