वार्ताहर / खोची
रंगभूमीच्या वृद्ध कलाकारांना राज्य शासनाच्या वतीने मानधन देण्यासाठी पेन्शन योजना लागूू करून निश्चित न्याय देवू.तसेच कलावंतांच्या समस्या दूर करण्यासाठी शासन दरबारी निश्चित प्रयत्न केले जातील. कोल्हापूर चित्रनगरीच्या ऊर्जितावस्थेत साठी निधी मंजूर करून दिला आहे.असे राज्याचे महाराष्ट्र राज्यांचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कुलकर्णी, कोल्हापूरचे नगरसेवक कमलाकर भोपळे,कलाकार संजय हळदीकर,सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलावडे, संजय पाटील, छाया सांगावकर आदी उपस्थित होते.
ते मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने नंरदे ता.हातकणंगले येथील शरद कारखाना कार्यस्थळावर ज्येष्ठ रंगकर्मींच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.यावेळी कोल्हापूर चित्रनगरीला चौदा कोटींचा निधी व मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्याबद्दल शाश्वत प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या वतीने मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा नगरसेवक कमलाकर भोपळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कुलकर्णी यांचा मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते तर “तुझ्यात जीव रंगला” फेम गोदाक्का छाया सांगावकर यांचा सत्कार स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कुलकर्णी म्हणाले,आजच्या घडीला या कलावंतांची उपेक्षा केली जात असताना सत्कार मिळतो आहे.हे भाग्य आहे. कलावंताला रसिकाची दाद अपेक्षित असते.कलावंताचा सत्कार हे विकासाचे,प्रगतीचे लक्षण असून कलाकारांची संस्कृती हि त्यागवादी असते. त्यामुळे कलाकारांना प्रोत्साहन महत्वाचे असते,असे सांगितले. यावेळी छाया सांगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षवर्धन आलासे यांनी केले.