प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेच्यावतीने आरोग्य किटकनाशक विभागामार्फत कसबा बावडा परिसरात रविवार, सोमवारी डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणा करीता डास-अळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षण मोहिमेत 3245 घरे, 5422 कंटेनर व 54 दुषित डास-अळी आढळून आल्या. या ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले.
साथरोग नियंत्रणासाठी महापालिकेने खासगी एजन्सी मार्फत 25 बिडिंग चेकर्स् नेमले आहेत. आरोग्य निरिक्षक, मुकादम, डासअळी सर्व्हेक्षण कर्मचारी यांच्यासह या बिडींग चेकर्सनी सावरकर गल्ली, हनुमान तलाव मागील बाजू, माळ गल्ली, पिंजार गल्ली, आंबेडकर नगर, संगपाळनगर, आंबेगल्ली, बलभीम गल्ली, शिंदे गल्ली, स्मशान मागील झोपडपट्टी, जयभवानी गल्ली, बिबटया बोळ तसेच कागलवाडी, वाडकर गल्ली, चावडे गल्ली, उलपे गल्ली, चौगुले गल्ली, शिवतेज गल्ली, गणेश कॅलनी, धनलक्ष्मी कॉलनी, शिवसम्राट, हवालदार कॉलनी, रणदिवे गल्ली, उलपेमळा, नेजदार कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, डी.वाय.पाटील कॉलेज मेन रोड, स्वराज कॉलनी, राजाराम कॉलनी, दगडी चाळ, धनगर गल्ली, शहाजी नगर गेट समोर परिसर इत्यादी ठिकाणी डास-अळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
महापालिकेच्या नागरिकांना सूचना
डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे आढळल्यास महापालिकेचा आरोग्य विभाग व शासकीय रुग्णालयाशी त्वरीत संपर्क साधावा. सेप्टिक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविण्यात यावी. आठवडयामध्ये साठणाऱया पाण्याचे पिंप, भांडी एकाच ठिकाणी भरुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा. फ्रिजमधील डिफ्रॉस ट्रे मधील पाणी आठ दिवसातून एकदा रिकामे करण्यात यावे. घराजवळील परिसरामध्ये रिकामे टायर्स्, नारळाच्या करवंटया, डबे इत्यादीमध्ये पाणी साठू न देणे. घरामध्ये लांब बाहयांचे व संपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावे. डास प्रतिबंधक कॉईल तथा क्रिम वापरावे, अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत.