प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी कोरोनामुळे मृत्यूची संख्या निरंक राहिली. दरम्यान, गेल्या 24 तासांत 13 नवे रूग्ण दिसून आले. तसेच 3 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 93 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 455 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यत केरोनाने 1,722 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 848, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 370 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. सध्या 93 सक्रीय रूग्ण आहेत. सोमवारी दिवसभरात 455 जणांची तपासणी केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून सोमवारी 370 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 359 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 64 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 65 रिपोर्ट आले, त्यापैकी 63 निगेटिव्ह आहेत. सोमवारी गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 1, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 1, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 9 व अन्य 2 असे 13 रूग्ण आहेत. दिवसभरात तिघांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 129 झाले. नव्या 13 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 944 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 13, कोरोनामुक्त 3, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 944
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 129
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 93
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1722
गेल्या 24 तासांत 455 संशयितांची तपासणी