प्रतिनिधी/ बेळगाव
कसाई गल्ली येथील मनपाच्या मालकीची फिश मार्केटची इमारत बांधून तीन वर्षे झाली. पण भाडेतत्त्वावर देण्यापूर्वीच काही व्यावसायिकांनी व्यवसाय थाटला आहे. सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी शुक्रवारी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना विश्वासात घेऊन फिश मार्केटची इमारत रिकामी करण्यात आली. महापालिकेच्यावतीने टाळे ठोकून ताबा घेण्यात आला.
मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याने भाडे वसूल करण्यासाठी टाळे ठोकण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. कसाई गल्ली येथील मनपाच्या मालकीची फिश मार्केटची इमारत बांधून तीन वर्षे झाली. पण भाडेतत्त्वावर देण्यापूर्वीच काही व्यावसायिकांनी व्यवसाय थाटला आहे. सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी शुक्रवारी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना विश्वासात घेऊन फिश मार्केट इमारतमधील गाळे रिकामी करण्यात आले.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध ठिकाणी गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. कसाई गल्ली येथे फिश मार्केट, मटण मार्केट, बकरी ठेवण्याचे शेड आणि कत्तलखान्याची इमारत महापालिकेने नव्याने उभारली आहे. सदर इमारत भाडेतत्त्वावर देण्यात आली नाही. सध्या काही व्यापाऱयांनी आपला व्यवसाय फिश मार्केटच्या इमारतीमध्ये सुरू केला आहे. सदर इमारत भाडेतत्त्वावर देण्यासाठी मनपाने शुक्रवारी लिलाव आयोजित केला आहे. फिश मार्केटमध्ये वीस गाळे असून बारा वर्षांकरिता भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. याकरिता गाळे रिकामी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनपाच्या महसूल विभागाने फिश मार्केटची इमारत ताब्यात घेतली. येथील व्यावसायिकांना विश्वासात घेऊन इमारत रिकामी करण्यात आली. त्यामुळे विपेत्यांना व्यवसाय करण्याची अडचण निर्माण झाली. गाळे रिकामी करण्याची सूचना करण्यात आल्याने मासे विपेत्यांनी फिश मार्केटसमोरील शेडमध्ये प्रवेशद्वारावर व्यवसाय थाटला.
फिश मार्केटच्या मागील बाजूस बकरी ठेवण्याचे शेड आणि कत्तलखाना आहे. हे देखील भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यामुळे कत्तलखान्याच्या इमारतीसह बकरी ठेवण्याच्या शेडला टाळे ठोकण्यात आले. बकरी ठेवण्याच्या शेडमध्ये व्यावसायिकांनी बकरी ठेवली होती. बकरी ठेवण्यासाठी आपल्याला जागा नाही, त्यामुळे काही दिवस मुदत देण्याची मागणी मटण विपेत्यांनी केली. पण यापूर्वी महापालिकेने बरीच मुदत दिली आहे. लिलाव आयोजित करण्यात आला असल्याने मुदत देता येणार नाही, अशी माहिती महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी दिली. यानंतर शेड रिकामी करण्याची सूचना केली. त्यामुळे विपेत्यांनी बकरी हटवून शेड रिकामी करून दिले.
या कारवाईवेळी महापालिकेचे कायदा अधिकारी यु. डी. महांतशेट्टी, मार्केट महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, साहाय्यक महसूल अधिकारी परशुराम मेत्री, महसूल निरीक्षक, बिल कलेक्टर, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.