ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. सोलंकी यांनी चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. यासोबतच त्यांनी एकदा भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून देखील काम केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माजी दिगवंत नेते माधव सिंह सोलंकी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, माधव सिंह सोलंकी हे मोठे नेते होते. गुजरातच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि सेवेसाठी माधव सिंह सोलंकी हे कायम स्मरणात राहतील.
पुढे ते म्हणाले, माधव सिंह सोलंकी यांना अभ्यासाची फार आवड होती. ज्यावेळी आमची भेट व्ह्यायची त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असू.
दरम्यान, माधव सिंह सोलंकी यांना केएचएएम थेरपी चे जनक म्हणून ओळखले जाते. तसेच ते नावाजलेले वकील देखील होते. राजकारणात त्यांचे नाव मोठे होते. 1977 मध्ये पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले. तर 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले, या यशात सोलंकी यांचा मोठा वाटा होता.