पुणे \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते खासदार राजीव सातव कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 19 दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर सामान्य वार्डमध्ये देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना 25 एप्रिलला उपचारासाठी जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी, त्यांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. आता, त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.
राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते आहेत. सातव हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला होता. राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली.काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरातच्या काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.