बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची एकाहून अधिक घरे आहेत. काजोल आणि अजय देवगण देखील या यादीत सामील आहे. काजोलने पवई येथील स्वतःच्या अपार्टमेंटला 90 हजार रुपये प्रति महिना या दराने भाडेतत्वावर दिले आहे. काजोल पती अजय आणि मुलांसमवेत जुहूमध्ये स्वतःच्या लॅविश बंगल्यात राहते. काजोलची भाडेतत्वावर देण्यात आलेली मालमत्ता 771 चौरस फुट आकाराची आहे.
हे अपार्टमेंट हिरानंदानी गार्डन्सच्या एटलांटिस प्रोजेक्टच्या 21 व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंटचा भाडेकरार अन परवाना करार 3 डिसेंबर रोजी नोंदविण्यात आला होता. दस्तऐवजानुसार भाडेकरूने 3 लाख रुपयांचे डिपॉझिट जमा केले आहे.
90 हजार रुपयांचे भाडे असलेल्या या अपार्टमेंटचे भाडे एक वर्षानी वाढणार आहे. एक वर्षानंतर याचे भाडे 96,750 रुपये प्रतिमहिना होणार आहे. काजोल-अजय यांनी शिवशक्ती हा बंगला 60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. त्यांचे हे घर 590 चौरस यार्ड्समध्ये पसरलेले आहे. अनेक कलाकारांनी मागील काही दिवसात स्वतःची घरं भाडेतत्वावर दिली आहेत.