प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर हे जसे मैदानी खेळामध्ये पुढे असते तसेच नाटय़ रसिककलेमध्येही पुढे असते. अनेक कलाकार या साताऱयाच्या मातीत घडले आहेत आणि घडत आहेत. सयाजी शिंदेसारखे कलाकार साताऱयाच्या मातीतूनच आज अव्वलस्थानी आहेत. याच साताऱयातील कला पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱया शाहू कला मंदिराचा पडदा कोरोना तर नुतनीकरणामुळे गेली दोन वर्ष बंद होता. आता नुतनीकरण पूर्ण झाले असून खासदार उदयनराजेंच्या हस्ते या नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळा दि. 21 रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने ऐतिहासिक असे घाशीराम कोतवाल हे नाटक सातारकरांसाठी मोफत ठेवण्यात आले आहे. भाजपाचे सांस्कृतिक कलाचे प्रकोष्ट पकंज चव्हाण यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे कलाप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.
साताऱयाच्या भूमीत जसे खेळाडू, देशाच्या सिमेवर रक्षण करणारे सैनिक घडले, घडत आहेत तसेच नाटय़कलाकार, अभिनेते ही घडतात. नाटय़ कलाकार घडवणारे केंद्र म्हणजे सातारा पालिकेचे शाहू कलामंदिर आहे. या शाहू कलामंदिरामध्ये अनेक नाटकांनी रेकॉर्ड केले ओह. साताऱयातील याच शाहू कलामंदिरात नाटकाबरोबर ऐतिहासिक व्याख्याने झाली आहेत. मात्र, हेच शाहू कलामंदिर गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. मध्यंतरी एक वर्षापासून कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर प्रशांत दामले आणि कविता लाड यांचे एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग झाला होता. त्यानंतर एक जादूच्या प्रयोगाचा खेळ झाला होता. पुन्हा कोरोनामुळे शाहू कलामंदिराचा पडदा बंद झाला होता. नुतनीकरणाचे कामही सुरु करण्यात आले होते. यानंतर सातारा पालिकेचे नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी विशेष लक्ष देवून मुख्यअभियंता दिलीप चिद्रे यांच्याकडून नुतनीकरणाचे काम करुन घेतले. त्यामध्ये सर्व इलेक्ट्रीकल पडदे, रंगमंच, ड्रेसिंग हॉल अशी सुधारणा करण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यामुळे दि. 21 रोजी सातारकरांच्या सेवेत ऐतिहासिक नाटीका सादरीकरणाने पुन्हा रुजू होणार आहे.
पंकज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
पंकज चव्हाण यांनी एकदा लक्ष घातले की ते मार्गी लावणार हे ठरलेले सूत्र सातारकरांना ज्ञात आहे. पंकज चव्हाण यांनी शाहु कलामंदिराच्या नुतनीकरणाच्या लोकार्पण सोहळय़ाची जबाबदारी घेतली अन् स्वतः लक्ष घातले. साताकरांसाठी त्यांनी ऐतिहासिक असे घाशीराम कोतवाल हे नाटक सातारकरांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे कलारसिकांना मेजवानी मिळणार आहे.