प्रतिनिधी/ काणकोण
कारवारमार्गे गोव्यात येणाऱया एका कारला 3 रोजी मध्यरात्री भगतवाडा-काणकोण येथे झालेल्या एका भीषण अपघातात कारमधील एका महिलेला मृत्यू आला, तर सदर कारमधील चालकासहित अन्य चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत व्यक्तीचे नाव मिलाग्रिना रिबेलो 49 वर्षे असे असून
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील व्यक्ती मूळ वार्का-सासष्टी येथील असून एकाच कुटुंबातील आहेत. मेंगलोर येथील आपल्या नातेवाईकांकडे जाऊन येत असताना कारचालकाचा वाहनावरील ताबा गेल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत सदर महिलेला मडगावच्या इस्पितळात उपचारासाठी पाठविले असता त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आले.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे योजन रिबेलो (58), नैनिका रिबेलो (21), ऍनली रिबेलो (17) आणि कारचालक ऍलिसन ाdनरिबेलो (25 वर्षे) अशी आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक विसाव्यासाठी बसत असतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. काणकोणचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी पंचनामा करून पुढील तपास चालू केला आहे.