प्रतिनिधी/ म्हापसा
गोवा सरकारने गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश 2020 जारी केला आहे. तो गोव्यातील पालिकांना जाचक आहे. सरकारने हा अध्यादेश रद्द करावा. गोवा फॉरवर्डचा राज्यातील दुकानदारांना पूर्ण पाठिंबा असून सरकारला अध्यादेश आणण्याची काय गरज होती? यापेक्षा दुकानदारांच्या कराबाबत सरकारने विधानसभेत खुलेआम चर्चा करावी. त्यामुळे कोण दुकानदारांच्या पाठीशी आहे स्पष्ट होईल. शिवाय ग्रामीण भागात असलेल्या घरांना व दुकानांचा कर पंचायतींनी आकारावा जेणेकरून त्याचा फायदा पंचायतीला होणार आहे, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी म्हापसा दत्तवाडी येथे इंद्रधनुष सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अ.गो. स्ट्रिट व्हेंडर संघटना स्थापणार- गोवा फॉरवर्ड
म्हापसा बाजारपेठेत पूर्वी जे लोक बसत होते ते आज दिसतच नाही. कोविडच्या काळात पालिकेने वयोवृद्धांचे बॉक्स काढून टाकले. हे फक्त म्हापशातच नव्हे तर अन्य पालिकेमध्येही घडले आहे. येणाऱया काळात गोवा फॉरवर्ड पक्ष अखिल गोवा स्ट्रिट व्हेंडर असोसिएशन स्थापन करणार असून याद्वारे जे कुणी पदपथावर बसतात त्यांची एक संघटना करून त्यांना गोवा फॉरवर्ड पक्ष पाठिंबा देणार आहे, अशी माहिती किरण कांदोळकर यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत सरकारला आम्ही नको त्या गोष्टी करायला लावणार नाही असे श्री. कांदोळकर यांनी स्पष्ट केले.
उसकई व नास्नोळा आदी सर्व ठिकाणी 2014 पूर्वीची घरे आहेत ती कायदेशीर करणार असे ठोस आश्वासन मनोहर पर्रीकर यांनी दिले होते मात्र त्यांचे निधन झाले. कोमुनिदाद कायदा आणणार होते मात्र ते केंद्रात गेले. या सरकारने आपली खेळी खेळून निवडणुका जिंकण्याकडे भर देत आहे अन्य त्यांना काहीत कळत नाही.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आमोणा येथे खुलेआम रेती काढतात
आपल्या मतदारसंघात रेती बंद आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आमोणे येथे खुलेआम रेती सुरू आहे त्याचे व्हिडीओही आपल्याकडे आहेत असे श्री. कांदोळकर यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघातील रेती येत्या चार दिवसात सुरू न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील रेती न्यायालयात जाऊन बंद पाडू असे त्यांनी सांगितले.
कमळाला घरी पाठविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे
पेडणे व म्हापसा पालिकामध्ये गोवा फॉरवर्डचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करण्यात येईल. पेडणेमध्ये नऊही ठिकाणी तर म्हापशाबाबत विचार केला जाईल असे कांदोळकर यांनी स्पष्ट केले. आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत. पूर्वीची निवडणूक भाजपची होती. कमळाला घरी पाठवायला पाहिजे तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असे कांदोळकर यांनी सांगितले.
दुकानदाराबाबत विधानसभेत खुली चर्चा करा
पक्षपातळीवर करा अथवा कसेही पालिका निवडणुका करा आम्ही आमचे उमेदवार म्हापसा व पेडणेमध्ये रिंगणात उतरवणारच. आमची तयारी आहे पक्ष पातळीवर केल्यास जास्त बरे. यावेळी पालिकेत जी घरे आहेत त्यांना ऑडीनन्स आणतो म्हणून सांगितले आहे पणग्रामीण भागातील घरांचाही कर आकारा. त्याचा फायदा पंचायतीला होणार. निवडणुका जवळ ठेवून काहीही बोलतात. विधानसभेत यावर खुले आम चर्चा करा. ऑडिनन्स आणण्याची काय गरज. दुकानदार, कराबाबत विधानसभेत चर्चा करा जेणेकरून दुकानदारास कोण कोण मदत करणार हे स्पष्ट होणार आहे असे किरण कांदोळकर म्हणाले.