ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली असून, तेथील परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे. अफगाण सरकारने तालिबान्यांसमोर गुडघे टेकले असून, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनीही देश सोडून ताजिकिस्तानचा आसरा घेतला आहे. त्यानंतर अनेक नेते आणि नागरिक देश सोडून चालले आहेत. काबुल विमानतळ अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतल्यामुळे देश सोडण्यासाठी नागरिकांकडे काबुल विमानतळ हा एकच पर्याय आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपासून नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली आहे. आज सकाळीही या विमानतळावर लाखो नागरिकांची गर्दी होती. दरम्यान, देश सोडून पळून जाणाऱ्यांची विमानात बसताना चेंगराचेंगरी झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.