मुजावर गल्ली येथील घटना
बेळगाव : पावसामुळे एका जुन्या घराची भिंत कारवर कोसळली. शुक्रवारी सायंकाळी मुजावर गल्ली येथे ही घटना घडली असून या घटनेत कारचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
उपलब्ध माहितीनुसार एका जुन्या घराशेजारी उभी करण्यात आलेली केए 22 पी 9177 क्रमांकाच्या कारवर भिंत कोसळली. शिवाजी देसाई यांची ही कार आहे तर चंद्रकांत अनगोळकर यांच्या घराची भिंत कोसळली आहे.