मिरवणूक जुन्या मार्गानेच करावी : मडकईकर मिरामार – दोनापावल मार्गास जोरदार आक्षेप
प्रतिनिधी / पणजी
कार्निव्हलच्या आयोजनावरून मनपात जबरदस्त शिमगा रंगला असून कार्निव्हलसाठी मार्ग निवडीवरून वादाची ठिणगी पडली आहे. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात व महापौर उदय मडकईकर यांनी पारंपरिक जुन्या मार्गाचा हट्ट धरला आहे तर उत्तर गोवा जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त संजित रॉड्रीग्स यांनी मिरामार ते दोनापावल हा मार्ग निश्चित केला आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी मिरामार ते दोनापावल हा मार्ग निश्चित केल्या पार्श्वभूमीवर †िमरवणुकीसाठी जुने सचिवालय ते कला अकादमी हा मार्ग न दिल्यास कार्निव्हलमध्ये मनपा सहभागी होणार नाही, असा इशारा मडकईकर यांनी दिला आहे. त्यामुळे कार्निव्हल मिरवणूक वादात सापडली आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी पणजी मनपा आयुक्त संजित रॉड्रीग्स यांच्या समवेत बैठक घेवून कार्निव्हलसाठी मिरामार ते दोनापावल हा मार्ग ठरवला आहे. या बैठकीला मोन्सेरात, मडकईकर यांना बोलावले नाही. सदर बैठकीत मिरामार-दोनापावला मार्ग ठरल्याचे वृत्त मडकईकर, मोन्सेरात यांना मिळाले तेव्हा त्यांनी त्या मार्गास विरोध दर्शवला आणि जुन्या मार्गानेच कार्निव्हल मिरवणूक झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱयांना सादर केल्याची माहिती मडकईकर यांनी दिली. मनपा आयुक्त-महापौर यांच्यात समन्वय नसल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.
†िमरवणूक जुन्या मार्गानेच करावी अशी लोकांची मागणी असून ती योग्य आहे असे मडकईकर म्हणाले. जुना मार्ग सर्वांसाठी सोयीस्कर असून नवीन मार्ग त्रासदायक आहे असे स्पष्ट मत त्यांनी प्रकट केले आणि त्यावर पणजी मनपा ठाम असल्याचे ते म्हणाले.