ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,339 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 19 लाख 48 हजार 674 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.71 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 2,736 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 36 हजार 002 वर पोहचली आहे. सध्या 34 हजार 862 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 46 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 215 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.52 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 48 लाख 21 हजार 561 नमुन्यांपैकी 20 लाख 36 हजार 002 (13.74 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 78 हजार 676 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 1 हजार 911 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.