वार्ताहर/ बेडकिहाळ
बारवाड येथील पत्रकार व साहित्यिक रंगराव बन्ने यांना दौंड (जि. पुणे) येथील ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने 20 डिसेंबर रोजी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासो पोवार, हिंदू सम्राटचे संपादक उत्तम कागले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन कुलटे, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळे, फौजदार भगवान पालखे आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रंगराव बन्ने यांनी पत्रकारिता, धार्मिक, सामाजिक, सहकार क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संघटनेचे विनायक दोरगे, प्रा. एच. आर. पाटील, ज्ञान संकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, सुभाष भोसले, कारदगा येथील बाळासो नाडगे, तातोबा बत्ते, सिद्धाप्पा गावडे, बारवाडचे प्रल्हाद चौगुले, गजानन लोहार, विकास चौगुले, प्रदीप जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.