वार्ताहर/ येळ्ळूर
येळ्ळूर येथे 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाळून काळा दिन पाळण्यात येणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला बांधिल राहण्याचा निर्णय येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी होते.
दंडाला काळय़ाफिती, तोंडाला काळे मास्क आणि काळे ध्वज घेऊन निषेध करण्यात येणार आहे. यावेळी कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, रमेश मेणसे, सतीश पाटील, उदय जाधव, वामन पाटील, प्रकाश पाटील यांनीही विचार व्यक्त केले. शिवाजी कदम यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी परशराम घाडी, सूरज गोरल, बाळू पाटील, तुकाराम टक्केकर, निलेश बोबाटे, अजित पाटील, राकेश परीट, वाय. सी. इंगळे व म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.