प्रतिनिधी/ बेळगाव
मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे दि. 2 नोव्हेंबर रोजी ‘मधुरभेट’ हा अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5 ते 6 यावेळेत प्रसारित होईल. कै. लक्ष्मीबाई जोग व सखाराम जोग यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होत आहे. वीणा लोकूर या मधुरा यांच्याशी संवाद साधतील.
मधुरा वेलणकर यांचा परिचय पुढील प्रमाणे-
मधुरा या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. अभिनेत प्रदीप वेलणकर यांच्या त्या कन्या आहेत. अभिजित साठम यांच्या पत्नी व शिवाजी यांच्या त्या स्नुषा आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका, नाटक या तिनही माध्यमांमध्ये त्यांनी काम केले आहे. एक डाव धोबी पछाड, कॅनव्हॉस, उलाढाल, खबरदार, अधांतरीक, अशाच एका बेटावर, गोजीरी, पाऊलवाट, मातीच्या चुली, मी अमृता बोलते, हाफूस, रंगीबेरंगी, क्षणोक्षणी यासह अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
लग्नबांबाळ, मिस्टर ऍण्ड मिसेस, हा शेखर खोसला कोण आहे?, ही नाटके तर मृण्मयी, चक्रव्युह, सांज सावल्या, आपलेच घर, आता बोला ना, रिस्ते, स्पंदन या मालिकासह अन्य मालिकांमधून त्यांनी काम केले आहे. जजंतरम-ममंतरम व जॉन जॉनी एस पप्पा या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे त्यांनी लघुपटातही काम केले आहे.
कलागौरव, उमेद, सईबाई या पुरस्कारांसह महाराष्ट्र शासनाचे चार पुरस्कार त्यांच्या नावे जमा आहेत. याशिवाय अन्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.