विविध आर्थिक सेवा-व्यवसायांचाही समावेश राहणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
डिजिटल पेमेन्ट क्षेत्रातील अगेसर असणारी पेटीएम कंपनी किराणा दुकानदारांकरीता 100 कोटींची योजना आणणार आहे. पेटीएम कंपनीने किराणा स्टोअर्सच्या देवाण घेवाणीतून व्यापाऱयांना होणाऱया नुकसानीला दिलासा देण्यासाठी ही योजना आणलीय. 1 टक्का मर्चंट सवलतीच्या आधारावर व्यापाऱयांना पेटीएमच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करता येतील.
सदर योजनेसाठी पेटीएमने 100 कोटी रुपयांची वेगळी तरतूद किराणा स्टोअर्सच्या दुकानदारांसाठी केली आहे. यासाठी फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि मार्केटींगच्या साधनांची देवाणघेवाण केली जाणार आहे. याकरीता आवश्यक ती रक्कम गुंतवणूक करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि यातून सावरण्यासाठी पेटीएम ऑल इन वन क्मयूअरची सुविधा उपलब्ध करणार आहे. या सुविधेच्या आधारे डिजिटल पेमेन्टची वृद्धी वेगाने होणार असल्याचे म्हटले आहे. याअंतर्गत किराणा व्यावसायिकांना उत्तम लाभ मिळवता येणार आहे. त्यांच्या व्यवसायात दुप्पट लाभ होण्याची आशा सिनियर उपाध्यक्ष सौरभ शर्मा यांनी व्यक्त केली आहे.