बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर यांनी आपल्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त मास्क-सॅनिटायझर व अल्पोपहाराचे वाटप केले. बेळगाव मार्केटमधील भाजी तसेच इतर साहित्याची विक्री करणाऱया विपेत्यांना याचे वाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र कोरोनाचा धोका वाढत आहे. या वाढत्या संसर्गापासून बचावासाठी मास्क हा पर्याय सर्वांना उपलब्ध आहे. परंतु बाजारपेठेत अनेकवेळा नागरिक मास्कचा वापर न करता व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किल्लेकर कुटुंबीयांनी अशा व्यक्तींना मास्क, सॅनिटायझर व अल्पोपहाराचे वितरण केले.
Previous Articleलोकमान्यतर्फे नवी लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना
Next Article कर्नाटकात बुधवारी कोरोनाचा नवा विक्रम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.