प्रतिनिधी/ सातारा
देशात प्रथमच शिवजयंतीच्या औचित्य साधून भाजपाच्यावतीने राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेचे किल्ले अजिंक्यतारा येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या स्पर्धेची जिल्हास्तरीय प्राथमिक फेरी दि.9 रोजी मोठय़ा उत्साहात पार पडली. या फेरीचा राजमाता कल्पनाराजे यांच्या हस्ते बक्षीस वितरण जिल्हा बँकेच्या सभागृहात करण्यात आले. किल्ले अजिंक्याताऱयावर दि.19 रोजी होणाऱया राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेच्या अनुषंगाने संयोजकांच्यावतीने किल्ले अंजिक्याताऱयाचे दुर्गपूजन, ओटीभरण करण्यात आले.
भाजपाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने यावर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. दि.19 रोजी ही स्पर्धा किल्ले अंजिक्ताऱयावर होत आहे. तत्पूर्वी या स्पर्धेची प्राथमिक फेरी ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात घेण्यात आली. स्पर्धेला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. जिह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांना बक्षीसांचे वितरण राजमाता कल्पनाराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे पकंज चव्हाण, शहराध्यक्ष विकास गोसावी, नीलेश शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्याच स्पर्धेच्या अनुषंगाने किल्ले अजिंक्यताऱयाचे दुर्गपूजन आणि ओटी भरण करण्यात आले. सकाळी किल्ले अजिंक्यताऱयावर मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे ओटीभरण करण्यात आले. याच अनुषंगाने बोलताना पंकज चव्हाण म्हणाले, प्राथमिक फेरीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. शिवगान स्पर्धेला 15 हजार जणांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमुळे मोठा उत्साह आहे.