कुंभोज / वार्ताहर
कुंभोज ता. हातकणंगले येथे कुंभोज हिंगणगाव रोडनजीक असणाऱ्या सरकारमान्य देशी दारू दुकान काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून सदर दुकानातील जवळजवळ एक ते दीड लाख रुपये पेक्षा जास्त किंमतीचे दारूचे बॉक्स रोख रक्कम दोन हजार रुपये चोरून नेले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुंभोज येथील सरकारमान्य देशी दारूचे दुकान काल रात्री अकरानंतर दुकान मालक विठ्ठल कल्याणकर यांनी बंद केले व ते घरी निघून गेले काल रात्री कुंभोज ऊरुस असल्याने मोठ्या प्रमाणात सदर रस्त्यावरची रहदारी होती.
गोष्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला व सर्व प्रथम दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व त्याच्या असणाऱ्या मशिनरी बंद पाडल्या मशिन चे वायरींग तोडून टाकले व दुकानात यात्रेसाठी उपलब्ध असणारा देशी दारूचे जवळ 40 बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. रस्त्यावरती काही दारू च्या भरलेल्या बाटल्या पडल्या होत्या. सकाळी दुकानाच्या कामगाराला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुकान मालक कल्याणकर यांना फोनवरून संपर्क साधून चोरी झाल्याची माहिती दिली.
याबाबत विशाल कल्याणकर यांनी हातकणंगले पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून एक वर्षात दुकानात दोन वेळा चोरी झाली असून दोन्ही वेळा लाख रुपये पेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सदर चोरीचा तपास करण्याची मागणी विशाल कल्याणकर यांनी हातकणंगले पोलिस व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे . घटनास्थळी आज हातकणंगले पोलिसांनी भेट देऊन चोरीचा पंचनामा केला.