ऑनलाइन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून ही अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलीसांनी एजाज लकडावालाला पाटणा विमानतळावरुन अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान, एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत होती. 2003 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला अशी अफवा पसरली होती. एजाज लकडावाला याच्याविरोधात मुंबई आणि राजधानी दिल्लीत अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुह्यांचा समावेश आहे.