प्रतिनिधी/ बेळगाव
कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजाच्यावतीने रविवार दि. 17 रोजी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. टिळकवाडी येथील बुधवार पेठमधील समर्थ मंदिर (पतितपावन राम मंदिर) येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. हभप कुमारी चिन्मयी दामोदर कामत (फोंडा-गोवा) यांचे कीर्तन होणार आहे.
यावेळी विशेष गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच कोरोना योद्धय़ांचा सत्कार, तिळगूळ आणि हळदी-कुंकू समारंभही होणार आहे. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला समस्त समाज बांधव व भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.