वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ तालुक्यातील शिवसेनेचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य राजन जाधव यांच्यासह प.स. सदस्य डॉ. सुबोध माधव व पं स सदस्य सौ प्राजक्ता प्रभू यांनी रविवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. या प्रवेश खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक याना हा धक्का मानला जात आहे. या सदस्याच्या प्रवेशामुळे कुडाळ प. स वर भाजप बहुमतात आले आहे.