ओटवणे /प्रतिनिधी-
सावंतवाडी येथील कृषि पर्यवेक्षक वसंत बाळू भिल यांचे (४४ ) गुरुवारी ८ जुलै रोजी धुळे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या आकस्मित व अकाली निधनाचा त्यांच्या कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला. भिल हे मूळचे धुळे जिल्ह्यातील असून गेली २४ वर्षे त्यांनी सावंतवाडी कृषि विभागात चांगले काम केले. गेल्या ७ वर्षापासून ते माजगावात राहात होते. शेतकरी व बागायतदार यांना आधुनिक शेती बागायती बाबत मार्गदर्शन करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचाही लाभ मिळवून दिला. एक अत्यंत हुषार व कामाप्रती निष्ठा असणारे म्हणून ते परिचित होते. त्यांच्या या कृषीविषयक कार्यामुळेच त्यांना शासनाकडून जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई वडील, भाऊ असा परिवार आहे.