108 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून तस्करांनी चोरलेली माँ अन्नपूर्णा या देवीची मूर्ती भारताला परत देण्याचा निर्णय कॅनडाने घेतला आहे. ही मूर्ती तस्करीच्या माध्यमातून कॅनडामध्ये नेण्यात आली होती. मात्र, तेथे पडलेल्या धाडीत ती ताब्यात घेण्यात आली. नुकतेच पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱयावरून परतले आहेत. अमेरिकेच्या प्रशासनाने त्यांना भारतातून चोरीस गेलेल्या आणि अमेरिकेत सापडलेल्या 157 पुरातन मूर्ती आणि शिल्पे परत दिली आहेत. त्यानंतर माँ अन्नपूर्णेच्या मूर्तीची चर्चा सुरू झाली होती. भारत सरकारने कॅनडा सरकारकडे शब्द टाकून ही मूर्ती परत मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. कॅनडा सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मूर्ती भारताला परत देत असल्याची घोषणा केली आहे. लवकरच ही मूर्ती मायदेशी परत येईल. 29 नोव्हेंबर 2020 च्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या मूर्तीचा उल्लेख केला होता.
ही मूर्ती 1913 मध्ये वाराणसीच्या एका मंदिरातून चोरीला गेली होती. बऱयाच देशांचा प्रवास करून ती कॅनडात पोहोचली. तेथे प्रशासनाने ती ताब्यात घेतली आणि वर्ल्ड हेरिटेज सप्ताहात तिचे दर्शन घडले. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एक कलाकार दिव्या मेहरा यांना एका प्रदर्शनात ही मूर्ती दिसली. त्यांनी त्वरित भारतीय अधिकाऱयांना याची माहिती देऊन कॅनडा सरकारलाही सावध केले. त्यानंतर कॅनडा सरकारने मूर्ती ताब्यात घेऊन कॅनडातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना 19 नोव्हेंबर 2020 या दिवशी ही मूर्ती परत केली. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत ती दिल्लीत येईल, अशी शक्मयता आहे.