प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डचे सभागृह बरखास्त करण्यात आले असून गुरुवारपासून प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ आता निवडणुका घेण्याच्यादृष्टीने संरक्षण खात्याने हालचाली चालविल्या आहेत. त्यादृष्टीने मतदार याद्या तयार करण्याचा आदेश कॅन्टोन्मेंट बोर्डला दिला आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत निवडणूक होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत मागील वषी संपली होती. मात्र, कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे सभागृहाला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. दुसऱयांदा देण्यात आलेली मुदत दि. 10 फेब्रुवारी रोजी संपली आहे. त्यामुळे दि. 11 पासून प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. निवडणुका घेण्याच्यादृष्टीने निवडणूक विभागाने आणि संरक्षण खात्याने हालचाली चालविल्या आहेत. यापूर्वी मतदार यादी तयार करून तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या होत्या. मात्र, कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया थांबविण्याचा आदेश संरक्षण खात्याने बजाविला होता. त्यामुळे मतदार याद्या तयार करण्याचे काम थांबविण्यात आले होते. सध्या सभागृह अस्तित्वात नसल्याने निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे मतदार याद्या तयार करणे आवश्यक आहे. 30 एप्रिलपूर्वी अंतिम मतदार यादी तयार करून प्रसिद्ध करण्याचा आदेश सर्वेक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला बजावला आहे. त्यामुळे लवकरच मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. मागील मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या. तात्कालिक मतदार यादी प्रसिद्ध करून नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागून घेऊन त्याचे निवारण करण्याची सूचना संरक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. हरकती नोंदवून घेऊन निवारण केल्यानंतर 30 एप्रिलपूर्वी अंतिम यादी तयार करावी लागणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. मागील वषी तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये नवीन मतदारांची नावे वाढण्याची शक्मयता असून काही नावे कमी होण्याची शक्मयता आहे. पण नव्याने सर्वेक्षण करण्याबाबत कोणतीच मार्गसूची संरक्षण खात्याने दिली नाही. संरक्षण खात्याने अंतिम मतदार यादी 30 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मे महिन्यात निवडणुका घेण्यात येणार असल्याची चिन्हे दिसून लागली आहेत.