प्रतिनिधी / बेळगाव
कंग्राळ गल्ली परिसरात ड्रेनेज तुंबण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे येथील डेनेजवाहिनी घालण्याचे काम सुरू झाले आहे. बऱयाच दिवसांपासून निर्माण झालेली ही समस्या लवकरच संपुष्टात येणार आहे.
शहरातील डेनेजवाहिन्या घालून 40 वर्षे उलटली. पण डेनेजवाहिन्यांचे नूतनीकरण झाले नाही. परिणामी डेनेजवाहिन्या तुंबण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. कंग्राळ गल्ली परिसरातील ड्रेनेजवाहिनी तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. याचा फटका रहिवाशांना बसत आहे. येथील डेनेजवाहिनी बदलण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन डेनेजवाहिन्या बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारपासून हे काम हाती घेण्यात आल्याने या परिसरात खोदाईचे सत्र सुरू आहे. डेनेजवाहिन्यांची समस्या लवकरच निकालात निघणार आहे.