प्रतिनिधी/ बेळगाव
देशात कोरोनाचा फैलाव होण्यास प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीलाच कॅन्टोन्मेंट परिसरात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले होते. त्यामुळे संपूर्ण कॅम्प परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. या परिसरात आणखी रुग्ण आढळल्याने काही परिसर कंटेन्मेंट करण्यात येणार आहे. त्यामुळे मटण मार्केट, भाजीमंडई, चिकन मार्केट पुन्हा बंद ठेवण्याची शक्मयता आहे.
शहरात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर प्रारंभी कॅम्प परिसरात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कॅम्पसह 3 कि. मी. परिसर सीलडाऊन करून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यामुळे कॅम्प परिसरात सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. या भागात फिश मार्केट असल्याने शहरवासीय मासे खरेदीसाठी येत असतात. बीफ मार्केट, मटण मार्केट, भाजीमंडई येथे आहे. हे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली होती. 28 दिवस संपूर्ण परिसर बंद ठेवण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर परिसरातील व्यवहार व कामकाज सुरळीत सुरू झाले होते.
मात्र, आता पुन्हा या परिसरात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने कॅम्प परिसर कंटेन्मेंट करण्याच्यादृष्टीने हालचाली चालविल्या आहेत. कोरोनाची लागण झालेला रुग्ण चिकन मार्केट, मटण मार्केट आणि भाजीमंडई परिसरातील असल्याने या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत. कंटेन्मेंटची व्याप्ती कोरोनाग्रस्तांच्या घरापासून केवळ 50 मीटरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात असलेले व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डकडून उपलब्ध झाली आहे. कंटेन्मेंट करण्यात येणार असल्याने आता पुन्हा येथील विविध मार्केट बंद ठेवण्याची वेळ आली आहे.