टाळय़ा वाजवून डॉक्टरांनी दिला निरोप
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीतून बरा झालेला कॅम्प येथील आणखी एका तरुणाला मंगळवारी घरी पाठविण्यात आले. डॉक्टर, व वैद्यकीय कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवून त्याला निरोप दिला. पुढील 14 दिवसांसाठी घरातच राहण्याचा सल्ला त्याला देण्यात आला.
बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी मंगळवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षातून कसाई गल्ली कॅम्प येथील कोरोना मुक्त झालेल्या 26 वर्षीय तरुणाला (रुग्ण क्रमांक 127) घरी जाऊ देण्यात आले.
हा तरुण 31 मार्च रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. जिल्हय़ात आतापर्यंत 54 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहेत. बिम्सचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश दंडगी व वैद्यकीय कर्मचाऱयांनी या तरुणाला आरोग्य जपण्यासाठी काय करावे याविषयीचे सल्ले दिले.