प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे येत्या दि. 3 जानेवारी रोजी गोवा दोऱयावर येत असून वरुणापुरी ते मुरगाव बंदर दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलासह एकूण 4 प्रकल्पांचे ते उद्घाटन करतील. त्याचबरोबर 2 मोठय़ा प्रकल्पांचे भूमिपुजनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दि. 3 जानेवारीचा दौरा झंझावती असेल. पत्रादेवी ते बांबोळी या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग – 66 या चौपदरी महामार्गाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय मुरगाव पत्तन न्यास ते वरुणापुरी या दरम्यान सुमारे 5 किमी लांबीचा 4 पदरी उड्डाणपुल जो गेली अनेक वर्षे रेंगाळला होता तो आता पूर्ण झालेला आहे, त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गोवा भेटी दरम्यान, गडकरी भाजप आमदारांबरोबरही चर्चा करणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.