प्रतिनिधी / बेळगाव
दीड महिन्यापूर्वी अपघातात गंभीर जखमी झालेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. रविवारी आडपई गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी बेळगाव येथील त्यांचे नातेवाईक व मित्रांनी त्यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली.
श्रीपाद नाईक यांचे मेहुणे सतीश नाईक, राजू कुलकर्णी, वसंतराव हेब्बाळकर आदींनी रविवारी त्यांची भेट घेतली. ते सध्या आडपई येथील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्यांची तब्येत आता चांगली झाली आहे. ते लवकरच सार्वजनिक जीवनात परतणार आहेत.