प्रतिनिधी / बेळगाव
सिनिअर अंडर ऑफिसर प्रथमेश पाटीलला रक्षा राज्यमंत्री पदक बहाल करण्यात आले. सदर कार्यक्रम येथील जाधवनगरमधील 26 कर्नाटक बटालियनमध्ये शुक्रवार दि. 5 रोजी पार पडला. 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला होता. यावेळी पुरात सापडलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यास प्रथमेश पाटीलच्या नेतृत्वाखालील पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्याला 2019-20 या वर्षाचे रक्षा राज्यमंत्री पदक बहाल करण्यात आले आहे.
यावेळी डेप्युटी डायरेक्टरेट जनरल एअर कमोडोर एल. के. जैन यांच्या हस्ते प्रथमेशला रक्षा राज्यमंत्री पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ग्रुप कमांडर कर्नल के. श्रीनिवास, ग्रुप एओ कर्नल विनायक जाधव, ग्रुप टेनिंग ऑफिसर कर्नल मंजुनाथ एच, 26 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव खजुरिया, 25 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अभय अवस्थी, 8 एअर स्कॉर्डन कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन कुलकर्णी, एडम ऑफिसर कर्नल आदित्य कुमार वर्मा, एडम ऑफिसर कर्नल राजीव शावनी, ऑनररी कॅप्टन चांगाप्पा पाटील, ऑनररी लेफ्टनंट महादेव जगताप आणि सुभेदार मेजर राकेश कुमार उपस्थित होते.