प्रतिनिधी /बेळगाव
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या प्लास्टीक सर्जरी विभागातर्फे दि. 15 जुलै रोजी जागतिक प्लास्टीक सर्जरी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत भाजल्यामुळे निर्माण झालेले डाग, ओठांचे व्यंग, कॅन्सर शस्त्रक्रियेमुळे निर्माण झालेला डाग याच्याशी संबंधित आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्लास्टीक सर्जन डॉ. राजेश पोवार यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले.