डिफार्मसी, क्लिनिकल रिसर्चच्या विद्यार्थ्यांकडून नाटिका सादर
प्रतिनिधी /बेळगाव
केएलई कॉलेज ऑफ फार्मसी व जे. एन. मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिकेत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. अनिकेत यांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे महत्त्व उपस्थित रुग्ण, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी, एएनएम आणि इतर प्राध्यापक सदस्यांना सांगितले. क्षयरोगाचे उपचार आणि प्रतिबंधात्मक उपचाराबद्दल त्यांनी माहिती दिली. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुनिल जलालपुरे व डॉ. एम. एस. गणाचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
डॉ. बी. यशवंतराजा यांनी क्षयरोगाबद्दल जागरूकता आणि वैद्यकीय व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. डिफार्मसी व क्लिनिकल रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी यावर आधारित एक नाटिका सादर केली.
यावेळी डॉ. एम. बी. पाटील, प्रा. शशिकला वाली, गीतांजली सालीमठ यांच्यासह विद्यार्थी व रुक्मिणीनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.