व्हीटीयू चषक बेळगाव झोन हॉकी स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
जीआयटी महाविद्यालय आयोजित बेळगाव झोन व्हीटीयू चषक आंतर तांत्रिक महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएलएस जीआयटी महाविद्यालयाने एसडीएम सीईटी धारवाड संघाचा 2-0 असा पराभव करून व्हीटीयू चषक पटकाविला.
केएलएस जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन महाविद्यालयाचे डीन प्रा. सतिश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत 5 तांत्रिक महाविद्यालय संघांनी भाग घेतला होता. जीआयटी संघाने पहिल्या सामन्यात एआयटीएम संघाचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. नंतर उपांत्य सामन्यात एसजीबीआयटी संघाचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात जीआयटी संघाने एसडीएम धारवाड संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे जीआयटीचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर, प्रा. डॉ. जयंत कित्तूर, डीन. प्रा. सतिश देशपांडे, जिमखाना चेअरमन डॉ. प्रा. रमेश मेदार, क्रीडा प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडगदकाई, साहायक क्रीडा प्राचार्य क्रांती कुरणकर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.