प्रतिनिधी / बेळगाव :
ईस्लामिया स्कूल आयोजित 13 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय सेव्हन-ए-साईड फुटबॉल स्पर्धा केएलएस स्कूल संघाने निर्विवादपणे जिंकली. अंतिम फेरीत केएलएस स्कूल संघाने सेंट झेवियर्स स्कूल संघावर चुरशीच्या सामन्यात पेनाल्टी शुटआऊटवर 2-0 असा विजय मिळविला.
गुरूवारी केएलएस स्कूल विरूध्द सेंट झेवियर्स स्कूल या दोन तुल्यबळ संघातील सामना चुरशीच्या लढतीने झाला. अखेर निर्धारित वेळेत सामना शुन्य बरोबरीत सुटला यावेळी पंचांनी पेनाल्टी शुटआऊटवर निर्णय घेतला.
केएलएस स्कूलतर्फे नमित पाटील व साकीब बेपारी यांनी गोल नोंदविले. यावेळी सेंट झेवियर्स स्कूलचा ऋषिकेश सुनिल गोदवानी याने सर्वोकृष्ट गोलरक्षणाचे प्रदर्शन घडवून उपस्थित फुटबॉल शौकिणाकडून शब्बासकी मिळविली. या स्पर्धेतील सर्वोकृष्ट फुटबॉलपटूचा चषक नमित पाटील तर ऋषिकेश सुनिल गोदवानी याने सर्वोकृष्ट गोलरक्षकाचा चषक तर स्पर्धेतील शिस्तबध्द संघ पुरस्कार इस्लामिया स्कूल संघाने पटकाविला.
अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे रेहान मुजावर, खतालसाब मनियार, ईर्षाद पालेगार, बी. सी. सावनूर, सईदा अकोटे, सईदा खान यांच्या हस्ते विजत्या उपविजेत्या संघांना चषक व सर्व फुटबॉलपटूना सुवर्ण, रौप्य, कास्यपदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक खलील कोतवाल, इरफाण मुल्ला, एम. बी. बेळगावी, तौफीक अथणी विशेष परिश्रम घेतले पंच म्हणून योगेश सांवगावकर, कौशिक पाटील, समर्थ बांदेकर, राहिल खान काम पाहिले.
बुधवारी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोंमेट बोर्डचे उपाध्यक्ष व नगरसेवक साजिद शेख, रिजवान बेपारी, अल्लेउद्द्ाrन किल्लेकर, संस्थेचे उपाध्यक्ष खान साहेब मनियार, मुख्याध्यापिका एस.के.आरकाटे, सईदा खान, शकील कोतवाल, मानस नायक, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उद्घाटन सामन्यातील फुटबॉल पट्टूंचा प्रमुख पाहुण्यांना परिचय करुन देण्यात आला.
साजिद शेख यांनी फुटबॉलला किक मारुन स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला आहे. गुप अ मध्ये इस्लामिया स्कूल, ज्योती सेंट्रल स्कूल, अंजुमन स्कूल, ब गटात सेंट झेवियर्स स्कूल, के.एल.ई स्कूल, सेंट जर्मन स्कूल, क गटात लव डेल स्कूल, के.एल.एस स्कुल, जैन हेरीटेज, ड गटात कनक मेमोरियल स्कूल, कॅन्टोंमेट स्कूल, मदनी स्कूल यांचा सहभाग होता.