बांदा/ प्रतिनिधी-
कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली १० वर्षे महाराष्ट्रात कार्यरत असलेली , कोकणातून सुरु झालेली आणि कोकणच्या सामाजिक विकासासाठी पुढाकार घेणारी संस्था असून चिपळूणच्या या मदत कार्यात अग्रक्रमाने मदतीला पुढे आली. कोकण संस्थेच्या २८ कार्यकर्त्यांची टीम ६५०० किलो धान्य, शेकडो कपडे, हजारो पाण्याच्या बाटल्या, आरोग्याचे साहित्य, भांडी, सॅनिटरी नॅपकिन्स, खाऊ आणि साफसफाईचे सामान आदी घेऊन काल चिपळूण मध्ये मदत कार्यास दाखल झाली.
या समाज कार्यात संस्थेला अंधेरीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सिंधुरत्न मंडळ पालघर,आनंद फाउंडेशन, एक घास भुकेलेल्यांसाठी,कारगिल अमर जवान स्मारक समिती, जीवन विकास शिक्षण संस्था,साहस युथ फाउंडेशन, श्रीकृष्ण फूड इक्विपमेंट्स, पिंपळी बुद्रुक ग्रामस्थ मंडळ या सर्वांचे सहकार्य लाभले.
दळवटणे या गावापासून सुरु झालेल्या या उपक्रमात खेर्डी, वालोपे, बहादूर शेख नाका, मार्कंडी,पेठमाप, बहादूर शेख नाका,पोसरे, कळबस्ते, गोवळकोट, सती, उक्ताड, खेंड, कापसाळ तसेच शंकरवाडीतील शेकडो कुटुंबियांना संस्थेने मदतीचा आधार दिला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, संस्थाध्यक्ष दयानंद कुबल, सुरज कदम, सचिन धोपट, प्रवीण सुतार, प्रवीण विटमल, संतोष विटमल, मिलिंद मेस्त्री, सागर जांभळे, जीवन कुरूप, योगिता निजामकर, साक्षी पोटे, प्रीती पांगे, चेतन शीतप आदी उपस्थित होते तर या उपक्रमासाठी ,परेश राणे, वैभव सांडगे, श्रद्धा सांडगे,विश्वनाथ बेटकर, प्रसाद देवरुखकर, अर्चना शिंदे, महेश बिर्जे, अजित दळवी, शशांक सावंत,अक्षय ओवळे, अविनाश तोडणकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.