कामकाजाची केली पाहणी : अधिकाऱयांना दिल्या सूचना : राज्यातील प्रवाशांना आरटीपीसीआरची नाक्यावर सोय
वार्ताहर /कोगनोळी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असलेल्या कोगनोळी (ता. निपाणी) येथील सीमा तपासणी नाक्मयाला गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेशकुमार यांनी मंगळवारी दुपारी भेट देऊन कामकामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, चिकोडीचे डीएसपी मनोजकुमार नाईक, प्रांताधिकारी युकेशकुमार, निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे आदी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेशकुमार म्हणाले, कोगनोळी येथे सुरू असणाऱया सीमा तपासणी नाक्यावरील सर्वच कर्मचाऱयांचे काम चांगले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची गरज आहे. रिपोर्ट असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे सीमावर्ती महाराष्ट्रातील गावात व गोवा, केरळ, तामिळनाडू राज्यात जाण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच त्यांना या ठिकाणाहून सोडण्यात येणार आहे.
नागरिक-प्रवाशांनी सहकार्य करावे
याठिकाणी कर्नाटकातील प्रवाशांसाठी आरटीपीसीआर रिपोर्टची सोय सीमा तपासणी नाक्मयावर करण्यात आली आहे. कर्नाटकातील हा तपासणी नाका अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने घातलेले निर्बंध हे लोकांच्या हितासाठी असून नागरिक व प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उमेशकुमार यांनी केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले, या नाक्मयावरील सोयी-सुविधांबद्दल सर्वानुमते निर्णय घेऊन बदल करण्यात येतील. येथे कार्यरत असलेले विविध विभागाचे कर्मचारी उत्तमप्रकारे सेवा बजावत असल्याचे सांगितले. यावेळी मंडल पोलीस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, चिकोडी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार, साहाय्यक फौजदार एस. ए. टोलगी, अमर चंदनशिव, अभिजीत गायकवाड, महसूल विभागाचे तलाठी के. एल. पुजारी यांच्यासह आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेशकुमार यांनी बेळगाव येथेही पोलीस अधिकारी व इतर अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.